कोल्हापूर : नरेंद्र पटेल, अमित बुकशेटवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:46 PM2018-10-09T16:46:08+5:302018-10-09T16:50:06+5:30
एलईडी टीव्ही, मोबाईल, फ्रिज, मायक्रोओव्हन, साउंड सिस्टीम अशा दहा लाख किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयित नरेंद्र के. पटेल (रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, नागाळा पार्क) व अमित बुकशेट (रा. ताराबाई पार्क), गुरुराज देसाई (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला.
कोल्हापूर : एलईडी टीव्ही, मोबाईल, फ्रिज, मायक्रोओव्हन, साउंड सिस्टीम अशा दहा लाख किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयित नरेंद्र के. पटेल (रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, नागाळा पार्क) व अमित बुकशेट (रा. ताराबाई पार्क), गुरुराज देसाई (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला.
या प्रकरणी पोलिसांनी बुकशेट याला अटक केली आहे. त्याचे साथीदार पटेल आणि देसाई हे पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत संशयितांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
अधिक माहिती अशी, गिरीश शांतीलाल शहा (वय ५५, रा. रुईकर कॉलनी) यांचे इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. संशयित नरेंद्र पटेल व अमित बुकशेट यांनी शहा यांच्या दुकानातून ५५ इंची एलईडी टीव्ही, मोबाईल, ७५ इंची टीव्ही, फ्रिज, मायक्रोओव्हन, मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीम असे आठ लाख ८७ हजार रुपयांचे साहित्य नेले होते.
त्यासाठी पटेल यांनी दिलेल्या रकमेचा धनादेश न वटल्याप्रकरणी शहा यांनी ३० सप्टेंबरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
त्यांच्याबरोबरच योगेश नंदलाल हेडा (रा. नागाळा पार्क) यांचेही बिंदू चौकात इलेक्ट्रिक दुकान आहे. येथून या दोघा संशयितांनी दोन टीव्ही, डिश घेऊन हेडा यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी बुकशेटकडून चोरीचे साहित्य जप्त केले आहे.