कोल्हापूर : मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात एकत्र या : कोळसे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:51 PM2018-07-21T17:51:20+5:302018-07-21T18:04:22+5:30
देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.
कोल्हापूर : देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.
रयत संघाचे संस्थापक एस. आर. पाटील यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी शाहू स्मारक भवनात आयोजित कार्यक्रमात ते ‘२०१४ नंतरचा भारत’ या विषयावर बोलत होते.
‘गोकुळ’ व एस. आर. पाटील ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, आनंदराव यादव, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. डी. पाटील, सचिन पाटील, नामदेवराव कांबळे, माधुरी जाधव, सचिन पाटील, मंगला बडदारे-पाटील, आदी उपस्थित होते.