कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या चित्र-शिल्प प्रदर्शनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 01:12 PM2019-09-08T13:12:33+5:302019-09-08T13:13:32+5:30
कोल्हापूर आर्ट फौंडेशन आणि कोल्हापूरातील चित्रकार ग्रुपमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी आयोजितक केलेल्या २०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'चित्र-शिल्प प्रदर्शनाला रविवारी प्रारंभ झाला.
कोल्हापूर : कोल्हापूर आर्ट फौंडेशन आणि कोल्हापूरातील चित्रकार ग्रुपमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी आयोजितक केलेल्या २०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'चित्र-शिल्प प्रदर्शनाला रविवारी प्रारंभ झाला.
छत्रपती शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या या चित्र-शिल्प प्रदर्शनात दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन आज रविवार दि. ८ सप्टेंबर ते बुधवार दि. ११ सप्टेंबर पर्यंत खुलं असणार आहे.
यावेळी, दळवीज आर्टसचे प्राचार्य अजेय दळवी, प्रशांत जाधव, संजीव संकपाळ , ईनायत शिडवणकर, नागेश हंकारे , अतुल डाके, मनोज दरेकर , विजय टिपुगडे, मंगेश शिंदे, सुनिल पंडित , विलास बकरे , शिवाजी म्हस्के , बबन माने, सतीश घारगे, स्वप्नील पाटील तसेच अन्य कलाकार व कलाप्रेमी उपस्थित होते.