कोल्हापूर : सुतार-लोहार समाजासाठी कारागीर विकास महामंडळ : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:52 PM2018-05-21T13:52:23+5:302018-05-21T13:52:23+5:30
सुतार-लोहार समाजासाठी विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
कोल्हापूर : सुतार-लोहार समाजासाठी विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन येथे सुतार-लोहार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित वधू-वर पालक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शांताराम सुतार, उपाध्यक्ष विजय लोहार, खजानिस अशोक सुतार, सचिव राहुल सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन संस्थेच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील यांना सादर करण्यात आले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सरकार सुतार-लोहार समाजासोबत आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून समाजाची प्रमुख मागणी असलेले विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल.
बंद असलेली आरायंत्रे सुरू करावीत, गावातील गायरानामध्ये शहरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये सुतार-लोहार समाजासाठी मोफत भूखंड मिळावा, अशी मागणी शांताराम सुतार यांनी केली.
यावेळी दिलीप सुतार, विनोद सुतार, संजय महागांवकर, कृष्णात लोहार, गणेश सुतार, प्रदीप लोहार, बाजीराव लोहार, मारुती लोहार आदींसह वधू-वर व पालक उपस्थित होते.