कोल्हापूर : अस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:22 AM2019-01-01T11:22:21+5:302019-01-01T11:24:17+5:30

थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह्याचा पारा १० डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Kolhapur: Asthma, heart attack, cardiac arrest, cold weather | कोल्हापूर : अस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका

कोल्हापूर : अस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देअस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका आणखी दोन दिवस पारा १० डिग्रीपर्यंत राहणार

कोल्हापूर : थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह्याचा पारा १० डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

संपूर्ण देशभर थंडीची लाट पसरली आहे, उत्तरेकडून थंडीची लाट दक्षिणकडे सरकली आहे. अंगाला बोचणारे वारे रक्त गोठवत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा व खानदेशात थंडीचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्राचा पाराही घसरला असून कोल्हापूरचे किमान तापमान १० डिग्रीपर्यंत खाली आले आहे. रोज तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढतच आहे.

थंडीचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध रुग्ण व लहान मुलांना होत आहे. विशेषत: अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना थंडी जीवघेणी ठरत आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने शरीरातील रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यातूनच पॅरालिसिसचे शक्यता अधिक असते. थंडीने न्यूमोनिया, सर्दी, खोकला, त्वचारोग, टॉन्सिल सूजणे आदी त्रास सुरू होतात. आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.

  1. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे करावे
  2. रात्री झोपताना अंगात व पांघरण्यासाठी ऊबदार कपडे वापरावीत.
  3. सकाळी लवकर थंडीत बाहेर पडू नये.
  4. गरम पेय, जेवण घ्यावे.
  5. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनक्रम ठरवावा.



तुलनात्मक कोल्हापुरातील तापमान, डिग्रीमध्ये

दिनांक                     किमान      कमाल       दिनांक                  किमान    कमाल
३१ डिसेंबर २०१७         १७             ३२            ३१ डिसेंबर २०१८       १०        २९
१ जानेवारी २०१८         १७             ३१             १ जानेवारी २०१९      १०       २९
२ जानेवारी २०१८          १७            ३०             २ जानेवारी २०१९      १०       ३०
३ जानेवारी २०१८          १६            ३०              ३ जानेवारी २०१९      १२      ३०


गेल्या तीन-चार दिवसांत थंडीचा कडाका वाढला असून त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: अस्थमा, हृदयाच्या रुग्णांनी अशा वातावरणात काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. आनंद सूर्यवंशी, वसगडे

Web Title: Kolhapur: Asthma, heart attack, cardiac arrest, cold weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.