Kolhapur: कोल्हापुरात खगोलप्रेमींनी घेतला वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद
By संदीप आडनाईक | Published: October 29, 2023 12:01 AM2023-10-29T00:01:25+5:302023-10-29T00:02:58+5:30
Kolhapur News: कोल्हापुरात काशीद कॉलनी येथे बृहस्पती शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी रात्री खगोलप्रेमींनी दुर्बिणीतून वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद घेतला. खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी दुर्बिणीतून उपस्थिताना ग्रहण काळातील चंद्र दाखवला.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - कोल्हापुरात काशीद कॉलनी येथे बृहस्पती शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी रात्री खगोलप्रेमींनी दुर्बिणीतून वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद घेतला. खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी दुर्बिणीतून उपस्थिताना ग्रहण काळातील चंद्र दाखवला. यावेळी त्यांनी ग्रहणविषयीचे गैरसमज दूर करणारे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिताना अवकाशविषयक "ग्रॅव्हिटी" हा इंग्रजी सिनेमा प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. सिनेट सदस्य ऍड. अभिषेक मिठारीच्या वाढदिवसाच्या केक ग्रहण काळामध्ये सर्वांनी खाऊन जुन्या रुढींना फाटा दिला. यावेळी डॉ. अनमोल कोठडीया, गजानन महाजन, राहुल सुतार, बाळू माळी, रेश्मा खाडे, बिजली कांबळे या मान्यवरांसोबतच सुमारे २५ स्त्री-पुरुष खगोल प्रेमींनी या कार्यक्रमाचा कोजागिरीच्या दुधासोबत विज्ञान माहितीचा लाभ घेतला.