कोल्हापूर :  चौथीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:06 AM2018-10-11T11:06:13+5:302018-10-11T11:08:15+5:30

चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस झाडलोट करण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पांडुरंग शामराव सुतार (वय ४२, रा. पळशिवणे ता.भुदरगड) असे त्याचे नाव आहे.

Kolhapur: Atrocities against fourth minor girl students; Teacher's life imprisonment | कोल्हापूर :  चौथीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला जन्मठेप

कोल्हापूर :  चौथीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला जन्मठेप

Next
ठळक मुद्देचौथीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारशिक्षकाला जन्मठेप

कोल्हापूर : चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस झाडलोट करण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पांडुरंग शामराव सुतार (वय ४२, रा. पळशिवणे ता.भुदरगड) असे त्याचे नाव आहे.



खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी पांडुरंग सुतार हा पारधेवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होता. दि. १३ जुलै २०११ रोजी त्याच शाळेत चौथीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याने शाळेच्या इमारतीमधील नवीन खोलीत झाडलोट करण्याचा बहाणा करून अत्याचार केला. हा प्रकार घरात सांगू नकोस म्हणून सुतारने पीडित मुलीस दोन रुपये खाऊसाठी दिले.

१५ जुलैला दिवसभर शेतात भाताचे रोपे लावून पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर तिने गुरुजींनी आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षक सुतार याच्या विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील सुजाता एस. इंगळे यांनी नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश कदम यांनी आरोपी सुतार यास कलम ३७६ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप, १ हजार रुपये दंड, दंड न भरलेस ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलीस हवालदार एम. एम. घाटगे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.
 

 

Web Title: Kolhapur: Atrocities against fourth minor girl students; Teacher's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.