कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:49 PM2019-01-09T12:49:51+5:302019-01-09T12:53:37+5:30
आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सुमारे ५०० औषध विक्रेते सहभागी झाले होते.
कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सुमारे ५०० औषध विक्रेते सहभागी झाले होते.
आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण भारतातील औषध विक्रेत्यांच्या वतीने देशव्यापी ‘हल्लाबोल’ आंदोलन उभारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढला. सकाळी सुभाषरोडवरील सर्व औषध विक्रेते एकत्र आले. त्यांनी प्रथम अन्न व औषध विभागाचे प्रभारी सहआयुक्त शामली महिंद्रकर आणि आरोग्य निरीक्षक महेश गाडेकर यांना निवेदन देऊन मागण्या समोर ठेवल्या.
त्यानंतर मोर्चा लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर असेब्ली रोड मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले. त्यावेळी आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल निदर्शने करण्यात आली. त्यावेळी आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी, दूरचित्रवाणीवर सुरू असणाऱ्या आॅनलाईन औषध विक्रीच्या जाहिराती बंद कराव्यात, अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलकांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन औषधविक्री कशी धोकादायक आहे, याबाबत सविस्तर कथन केले.
यावेळी शिष्ठमंडळात अखिल भारतीय औषध अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य दिलीप कदम, राज्य केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे संघटक व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव शिवाजी ढेंगे, संजय शेटे, किरण दळवी, खजानिस अशोक बोरगावे, सचिन पुरोहीत, प्रल्हाद खवरे तसेच सर्व संचालक, तालुका असोसिएशनचेपदाधिकारी, केमिस्ट यांचा सहभाग होता.
मागण्या...
- औषधांची आॅनलाईन विक्री बंद करावी.
- मुंबई उच्च न्यायालयाने आॅनलाईन औषध विरोधात दिलेल्या अहवालाची कार्यवाही करावी.
- संचहिन जाहिरातीच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी.
- आॅनलाईन कंपन्यांचे मालक, आॅपरेटर, जाहिरात करणारे व त्यात भाग घेणारे कलाकार तसेच कुरीअर कंपन्या यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा.