कोल्हापूर : महिला कैद्यांना ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी शासन स्तरावर प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:09 PM2018-06-25T19:09:11+5:302018-06-25T19:14:12+5:30
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांचे संगोपन चांगल्याप्रकारे होत आहे. येथील विविध उद्योग राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सुरू करावेत, तसेच येथील महिला कैद्यांना ‘अंबाबाई’चे दर्शन घडवून आणण्यासाठी शासनाला आपण विनंती करणार आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अंजली काकडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांचे संगोपन चांगल्याप्रकारे होत आहे. येथील विविध उद्योग राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सुरू करावेत, तसेच येथील महिला कैद्यांना ‘अंबाबाई’चे दर्शन घडवून आणण्यासाठी शासनाला आपण विनंती करणार आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अंजली काकडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
भायखळा-मुंबई येथील कारागृहामधील महिला कैदी मंजुळा शेट्टी हिच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची पाहणी महिला आयोगाच्या वतीने सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अंजली काकडे यांनी सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्यांचे स्वागत केले.