कोल्हापूर : शियेतील सरकारी जागा विक्रीचा प्रयत्न, शियेतील सुनिल निकमला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:47 PM2018-10-27T17:47:34+5:302018-10-27T17:48:38+5:30
शिये (ता. करवीर ) येथील सरकारी मालकीची रिकामी जागा खासगी असल्याचे सांगून तिच्या विक्रीचा प्रयत्न करून डॉक्टरला २१ लाख ४२ हजार रुपयांना गंडा घातलेप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित सुनील रामराव निकम (वय ४८, रा. हनुमाननगर, शिये) याला शनिवारी अटक केली. त्याचेकडून दिवसभर कसून चौकशी सुरु आहे.
कोल्हापूर : शिये (ता. करवीर ) येथील सरकारी मालकीची रिकामी जागा खासगी असल्याचे सांगून तिच्या विक्रीचा प्रयत्न करून डॉक्टरला २१ लाख ४२ हजार रुपयांना गंडा घातलेप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित सुनील रामराव निकम (वय ४८, रा. हनुमाननगर, शिये) याला शनिवारी अटक केली. त्याचेकडून दिवसभर कसून चौकशी सुरु आहे.
डॉ. रणजित भालचंद्र चिकोडे (वय ५१, रा. बाबा जरगनगर) यांना शिये येथील सर्व्हे नं. २८३ मधील १९ प्लॉट आपल्या मालकीचे असून ते विक्री करायचे असल्याचे संशयित निकम याने सांगून चिकोडे यांचेकडून २१ लाख ४२ हजार रुपये घेतले.
या प्लॉटचे खरेदी करारपत्र व जमिनीच्या सातबारा पत्रकासंदर्भात निकम याला विचारणा केली असता त्याने ते देण्यास टाळाटाळ केली. निकम याने दाखवलेली मिळकत शिये ग्रामपंचायत व शासनाच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच चिकोडे यांनी फिर्याद दिली. संशयित निकम याने आणखी कोणाला गंडा घातला आहे, याची चौकशी पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत.