कोल्हापूर : नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:44 AM2018-08-30T10:44:34+5:302018-08-30T10:54:01+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Kolhapur: Attention to some movements of suspicion of Naxal operations | कोल्हापूर : नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्ष

कोल्हापूर : नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्ष

Next
ठळक मुद्देनक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर लक्षपोलीस अधीक्षक : संशयितांची यादी एटीएसकडे; ठोस पुराव्यानंतर कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुण्यात एल्गार परिषदेच्या आयोजनप्रकरणी पकडण्यात आलेल्या माओवाद्याच्या तपासात ‘थिंक टँक’मधील सदस्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांतील बहुतांश उच्चशिक्षित आणि मानवी हक्क चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील परिस्थितीबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, नक्षलवाद्यांच्या कारवायांचे ध्येय जंगलातील युद्धाचे शहरी भागातही पूरक वातावरण निर्माण करणे हे आहे. त्यानिमित्त पुस्तक प्रकाशन, विविध मेळावे घेणे, आदी कार्यक्रम केले जातात. सकृत्दर्शनी काही कार्यक्रमांत हे कार्यकर्ते वारंवार दिसून येतात. चांगल्या कामांत अनेकांना गुंतवून शांत डोक्याने हे आपल्या नक्षलवादी कारवाया सुरू ठेवतात. ठरावीक वेळानंतर तेच अशांततेचे काम करून सहकाऱ्यांचे लक्ष विचलित करतात.

शहरामध्ये वावरणाऱ्या अशा संशयित नक्षलवाद्यांवर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या हालचालींवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांची नक्षलवादी संघटनांशी संलग्नता असल्याची माहिती ‘एटीएस’ पथकाच्या हाती लागली आहे.

त्यांच्यातील काहीजणांची यादीच तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींतून ठोस पुरावे आढळल्यास त्यांना कोणत्याही क्षणी उचलून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

कॅसिनो, व्हिडीओ पार्लरवर कारवाई करणार

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कॅसिनो व व्हिडीओ पार्लरमार्फत सुरू असलेला जुगार हा मुळापासून उपटून काढणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शहराच्या प्रमुख ठिकाणी चरस, गांजासारख्या अमली पदार्थांच्या विक्रीचे अवैध धंदे फोफावण्याची शक्यता आहे. त्यांना वेळीच लगाम घालणार असून सणांच्या कालावधीत गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: Attention to some movements of suspicion of Naxal operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.