कोल्हापूर : लेखक ल. रा. नसिराबादकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:43 PM2018-12-04T14:43:29+5:302018-12-04T14:44:09+5:30
संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
कोल्हापूर : संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
लेखक नसिराबादकर यांना मंगळवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. त्यावर त्यांच्या कुटंबियांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नसिराबाद (जि. जळगांव) हे लेखक नसिराबादकर यांचे मूळ गांव. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापक म्हणून काम सुरू केले.
या शिक्षण संस्थेच्या पंढरपूर, श्रीरामपूर, कराड, कोल्हापूर येथील महाविद्यालयांत त्यांनी काम केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात ते सन १९७९ मध्ये रूजू झाले. या विभागात त्यांनी वीस प्राध्यापक म्हणून, तर सहा वर्षे विभागप्रमुख काम पाहिले. संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, वक्ते आणि विचारवंत अशी त्यांची ओळख होती.
विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी सुमारे ३५ पुस्तकांचे लेखन केले. त्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास, व्यावहारिक मराठी, प्रबोधनाच्या पाऊलखुणा, आचार्य अत्रे साहित्य दर्शन आदी पुस्तके प्रसिद्ध होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी मराठीतून एम. फिल., पीएचडी पदवी प्राप्त केली. श्री महालक्ष्मी बँकेचे उपाध्यक्षपदी