पोलिस, प्रशासनाच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ करणार

By Admin | Published: April 15, 2016 12:28 AM2016-04-15T00:28:09+5:302016-04-15T00:35:55+5:30

अंबाबाई शांतता समितीचा निर्णय : दोन दिवसांत तारीख ठरविणार, प्रशासनाचा कोल्हापूरकरांवर अन्याय

Kolhapur bandhana 'to protest against the police, administration | पोलिस, प्रशासनाच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ करणार

पोलिस, प्रशासनाच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ करणार

googlenewsNext

कोल्हापूर : कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना मदत करणाऱ्या पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय अंबाबाई मंदिर शांतता समितीने गुरुवारी घेतला. या ‘बंद’ची तारीख दोन दिवसांत बैठक घेऊन ठरविण्यात येणार असल्याचे समितीच्यावतीने बाबा पार्टे यांनी सांगितले. देसाई यांना करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देताना जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर परिसरात अंबाबाई मंदिर शांतता समितीची बैठक झाली. बैठकीस सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ चव्हाण, नगरसेवक अजित ठाणेकर, दीपाताई पाटील, बंडा साळोखे, आदी प्रमुख उपस्थित होते. बैठकीतील निर्णयाबाबत बाबा पार्टे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे मंदिरात बुधवारचा गोंधळ झाला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देसाई यांना मदत करून पोलिस व जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरकरांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद आंदोलन करण्याचा समितीने एकमताने निर्णय घेतला आहे. या बंदची तारीख येत्या दोन दिवसांत समिती बैठक घेऊन ठरविणार आहे. यावेळी निवासराव साळोखे म्हणाले, मंदिरात स्त्री-पुरुष समानता पहिल्यापासून आहे. याठिकाणी अन्याय होत नसल्याने न्याय देण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही ११ एप्रिलला महिलांना गाभारा प्रवेश देऊन शांततेचा संदेश राज्याला दिला, असे असताना बुधवारी झालेला प्रकार अयोग्य होता. सामाजिक सलोखा अबाधित राहावा याची दक्षता कोल्हापूरकरांनी घेतली आहे. रामभाऊ चव्हाण म्हणाले, मंदिरातील बुधवारी स्थिती पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटले. देसाई यांना पोलिस व जिल्हा प्रशासनाने केलेली मदत अयोग्य आहे. त्याच्या निषेधार्थ करण्यात येणाऱ्या कोल्हापूर बंदबाबत बैठक घेऊन चर्चा करूया. कोल्हापुरात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आंदोलन उभारून लढा देऊया. बैठकीत अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, केदार मुनिश्वर, लालासो गायकवाड, जयकुमार शिंदे, महेश उरसाल, वैशाली महाडिक, अनिल घाटगे, अशोक पोवार आदींनी मते मांडली. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) मुळीक, सावंत यांचा निषेध : समितीचे शिष्टमंडळ अधीक्षकांना भेटणार देसाई यांना समर्थन देणाऱ्या प्रमोद पाटील, बी. एल. बर्गे, अनिल चव्हाण, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक आदींचा बैठकीत निषेध केला. तृप्ती देसाई यांना इतकी पोलिस सुरक्षा कशी काय पुरविण्यात आली. त्यांनी त्याचे शुल्क भरले होते काय? याबाबतची माहिती घेण्यासाठी शनिवारी (दि. १६) दुपारी बारा वाजता समितीचे शिष्टमंडळ जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे किसन कल्याणकर यांनी सांगितले. नगरसेवक अजित ठाणेकर : एका महिलेच्या स्टंटबाजीसमोर प्रशासन अगतिक झाले. आमच्या भावनांची पोलिस, जिल्हा प्रशासनाने कदर केली नाही. शिवाजीराव जाधव : कोल्हापूरची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आंदोलनाची धार वाढवावी लागणार आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. बंडा साळोखे : कायदा मोडणाऱ्यांना साथ देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी पदत्याग करावा. सुनील घनवट : परंपरा मोडणाऱ्यांना ‘कोल्हापुरी हिसका’ दाखविला आहे. नास्तिकाला अस्तिक बनविण्याचे काम देवीने केले आहे. दीपा पाटील : देसाई हिच्या स्टंटबाजीला ‘जशास तसे’ उत्तर आम्ही दिले आहे. आमची दिशाभूल करणाऱ्या पोलिस, जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करतो.

Web Title: Kolhapur bandhana 'to protest against the police, administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.