कोल्हापूर : उपज कलामंचच्या वतीने तबला महोत्सव शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:51 AM2018-09-25T10:51:25+5:302018-09-25T10:52:04+5:30
उपज कलामंचच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. २९ व ३०) तबलानवाज उस्ताद म्हमूलाल सांगावकर स्मृती तबला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : उपज कलामंचच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. २९ व ३०) तबलानवाज उस्ताद म्हमूलाल सांगावकर स्मृती तबला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गायन समाज देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात रेवती फाले, जितेंद्र मोरे, सचिन कचोटे, वामनराव मिरजकर यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. दुपारच्या सत्रात चार वाजता संदेश खेडेकर, प्रणव मोघे, प्रशांत देसाई, प्रदीप कुलकर्णी, राजप्रसाद धर्माधिकारी यांचे स्वतंत्र तबलावादन होईल.
रविवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मयुरेश शिखरे, नरेंद्र पाटील, दीपक दाभाडे, निखिल भगत, डॉ. नंदकुमार जोशी यांचे दुपारच्या सत्रात शंतनू कुलकर्णी, साहेबराव सनदी, गिरीधर कुलकर्णी, अमोद दंडगे यांचे तबलावादन होईल.
अरुण जोशी यांच्या तबला वादनाने महोत्सवाची सांगता होईल. त्यांना संदीप तावरे, सचिन कचोटे. अमित साळोखे, पद्मनाभ जोशी, मधुसुदन शिखरे, शिवराज पाटील, शशिकांत बसलगे व प्रिती मिरजकर यांची नगमा साथ असेल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.