राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये ‘कोल्हापूर’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 07:52 PM2018-11-02T19:52:19+5:302018-11-02T19:57:32+5:30
कोल्हापूूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय) संघाने पुणे विभागाचा ४-३ असा टायब्रेकरवर; तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबई विभागाने यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाचा २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
कोल्हापूूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय) संघाने पुणे विभागाचा ४-३ असा टायब्रेकरवर; तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबई विभागाने यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाचा २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शाहू स्टेडियम येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा ३-० असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. यात कोल्हापूरकडून प्रणव घाडगे, दिग्विजय आसनेकर, कुणाल चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. दुसºया उपांत्य सामन्यात मुंबई विभागाने क्रीडा प्रबोधिनीचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. यात मुंबईकडून श्रेयस व्हटकरने दोन, तर क्रीडा प्रबोधिनीतर्फे शंतनू लिंबूनरकर याने एकमेव गोल केला.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद पटकाविलेल्या मुंबई संघास शाहू छत्रपती व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी युवा नेमबाज शाहू माने, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, माणिक मंडलिक, नगरसेवक संभाजी जाधव, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
दुपारच्या सत्रात झालेल्या अंतिम सामन्यात यजमान कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघाला मुंबई विभाग संघाकडून २-१ असे पराभूत व्हावे लागले. मुंबईकडून रिद्धेश बकले, जुबेर मातवली यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली; तर कोल्हापूरकडून प्रणव कणसे याने एकमेव गोल केला.
मुलींमध्ये १७ वर्षांखालील गटात कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा ४-० असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. यात कोल्हापूरकडून अंजुदेवी हिने दोन, तर सना थोयबी, प्रणाली चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल करीत अंतिम फेरीत प्रवेश करण्यास साहाय्य केले. दुसºया उपांत्य सामन्यांत पुणे विभागाने औरंगाबाद विभागाचा ४-० असा पराभव केला. यात पुणेकडून स्नेहल कळमळकर हिने दोन, तर प्रतीक्षा कापरे, कीर्ती गोसावी यांनी प्रत्येकी एक गोल करीत आपल्या संघास अंतिम फेरीत पोहोचविण्यास मदत केली.
अंतिम सामन्यात कोल्हापूर व पुणे विभाग यांच्यात संपूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी झाली. यात कोल्हापूरकडून निहारिक पाटील हिने, तर पुणेकडून सृष्टी बडे हिने एक गोलची नोंद केली. टायब्रेकरवर निकाल झालेल्या या अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा ४-३ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. कोल्हापूरच्या विजयी संघात साक्षी जाधव, अनुष्का खतकर, रिया बोलके, रम्याश्री शांतिप्रसाद, संजना लगारे, भक्ती बिरनगडी, सनादबी, थुबी, प्रणाली चव्हाण, निहारिक पाटील, अंजुदेवी, देविका सरनोबत, अंशू याद, आदींचा समावेश होता.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, माणिक मंडलिक, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते.