कोल्हापूर : गरजूंना मिळाली भाजी चपाती, संवेदना सोशल फौंडेशनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:36 PM2018-04-14T14:36:17+5:302018-04-14T14:36:17+5:30
संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असून चवही छान आहे. यापुढील काळातही हाच दर्जा कायम ठेवावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर : गरीब, गरजू, वंचित कुटूंब, आधारहीन वयोवृद्ध नागरिक यांच्यासह नागरिकांच्या सोयीसाठी संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असून चवही छान आहे. यापुढील काळातही हाच दर्जा कायम ठेवावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
येथील संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने शाहुपूरीतील विद्या प्रबोधिनी येथे शहरातील गोर गरीब गरजुंसाठी सुरू केलेल्या पाच रुपयात चपाती भाजी या सामाजिक उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी अंजली पाटील, संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे, विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, स्थायी समितीचे सभापती अशिष ढवळे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कोल्हापूरचे प्रमुख विजय जाधव, अनंत खासबारदार उपस्थित होते. राहूल चिक्कोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली.