कोल्हापूर : भरतनाट्यम् सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध, निमित्त होते ‘सावळे विठाई’ कार्यक्रमाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:59 PM2017-12-26T15:59:53+5:302017-12-26T16:18:22+5:30
गणेश वंदना, श्रीकृष्णाच्या मनमोहक लीला, मीरेच्या कृष्णभक्ती समर्पणाचे दर्शन घडवत नृत्यांगना अभिश्री पाटील यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुणीदास फौंडेशन व महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा (पुणे) यांच्यावतीने आयोजित ‘सावळे विठाई’ कार्यक्रमाचे.
कोल्हापूर : गणेश वंदना, श्रीकृष्णाच्या मनमोहक लीला, मीरेच्या कृष्णभक्ती समर्पणाचे दर्शन घडवत नृत्यांगना अभिश्री पाटील यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुणीदास फौंडेशन व महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा (पुणे) यांच्यावतीने आयोजित ‘सावळे विठाई’ कार्यक्रमाचे.
केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. तमिळनाडू येथील राजेश्री आणि आनंदराव पाटील यांची कन्या व विदुषी वासंती श्रीधर यांची शिष्या असलेल्या अभिश्री पाटीलने कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने केली.
गंभीर नाट रागातील विघन राजम भजे, कृष्णाच्या मनमोहक लीला, कुशाग्र बुुद्धिमत्ता, शौर्य, द्रौपदीशी असलेले भावनिक नाते, माधुर्यमय बासरी वादनाने बहरणारा निसर्ग, पशु-पक्षी, वैशिष्ट्यपूर्ण बंध उलगडणारी ‘बन्सीवाले मन मोहा रचना’, मीरेची कृष्णभक्ती सांगणारे ‘मै तो गिरीधर नाचूंगी’ अशा एकाहून एक सरस रचना तिने सादर केल्या. अभिजात भरतनाट्यम्च्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले.