कोल्हापूर : ‘भोगावती’,‘ हनुमान’ सहकार भूषण, पुरस्कार पटकाविणाऱ्या पहिल्या दूध संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 04:31 PM2018-03-09T16:31:20+5:302018-03-09T16:31:20+5:30
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहकार भूषण पुरस्कार सडोली खालसा (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी दूध संस्था व घोटवडे (ता. राधानगरी) येथील हनुमान दूध संस्थेला जाहीर झाला आहे. ‘सहकार भूषण’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या दूध संस्था आहेत. शनिवारी पुण्यात शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहकार भूषण पुरस्कार सडोली खालसा (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी दूध संस्था व घोटवडे (ता. राधानगरी) येथील हनुमान दूध संस्थेला जाहीर झाला आहे. ‘सहकार भूषण’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या दूध संस्था आहेत. शनिवारी पुण्यात शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या गटातील संस्थांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले जातात. राज्यस्तरीय ‘सहकार महर्षि’, ‘सहकार भूषण’ अशा पुरस्काराने संस्थांना गौरवण्यात येते. यंदा ‘सहकार महर्षी’ साठी जिल्ह्यातून ‘गोकुळ’चा प्रस्ताव आहे.
सहकार भूषणसाठी जिल्ह्यातून बारा दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. जिल्हास्तरीय समितीने छाननी करून सहा संस्था विभागीय स्तरावर पाठविल्या. तेथून चार संस्था राज्यस्तरावर पाठवल्या. त्यातून ‘हनुमान’, घोटवडे व ‘भोगावती’ सडोली खालसा यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे येथे होणाऱ्या कृषी महोत्सव व सहकार परिषदेत या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार वितरण होणार आहे.
दृष्टीक्षेपात पुरस्कार प्राप्त संस्था-
भोगावती, सडोली खालसा :
स्थापना - १ जूलै १९६७
सभासद- ३८५
वार्षिक संकलन : म्हैस-२ लाख ६१ हजार ३३६, गाय - १ लाख ५० हजार ७०१ लिटर
उत्पादने- बर्फी, पेढे, लस्सी, खवा.
उलाढाल - ६ कोटी ४० लाख
नफा - २१ लाख ५० हजार
आॅडीट वर्ग - ४६ वर्षे सतत ‘अ’
सामाजिक काम - वृक्ष लागवड, रक्तदान शिबीरे, गरीब व अपंग विद्यार्थ्यांन शैक्षणिक साहित्य वाटप, आपत्तीवेळी सभासदांना मदत.
संस्थापक - माजी आमदार पी. एन. पाटील, मार्गदर्शन - निवासराव पाटील, संभाजीराव पाटील, उदय पाटील. अध्यक्ष - महादेव मगदूम.
हनुमान, घोटवडे
स्थापना- २४ आॅगस्ट १९७२
सभासद-५९६
वार्षिक संकलन - २ लाख ६ हजार ३३८ लिटर.
उलाढाल - २ कोटी ५७ लाख ६९ हजार
नफा -४ लाख ८८ हजार
आॅडीट वर्ग - सलग ३४ वर्षे ‘अ’
सामाजिक काम - गावात स्वच्छता गृहे, जनावरांची पाण्याची सोय, शतकोटी वृक्ष लागवड, सभासदांना मदत, संघाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
अध्यक्ष- अरूण डोंगळे, मार्गदर्शन - विजयसिंह डोंगळे, धीरज डोंगळे, सचिव -केरबा पाटील.