कोल्हापूर: बेपत्ता प्रेमीयुगुलाचे मृतदेह धामणी नदीत दोघेही हारपवडेचे; आत्महत्येचा पोलिसांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:20 AM2018-09-25T01:20:59+5:302018-09-25T01:23:43+5:30

हारपवडे (ता. पन्हाळा) येथून पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या प्रेमीयुगुलाचे रविवारी (दि. २३) धामणी नदीपात्रात मृतदेह आढळले. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 Kolhapur: The body of the missing lover, both of the Harpavade in the river Dhamani; Police suspect suicide | कोल्हापूर: बेपत्ता प्रेमीयुगुलाचे मृतदेह धामणी नदीत दोघेही हारपवडेचे; आत्महत्येचा पोलिसांचा संशय

कोल्हापूर: बेपत्ता प्रेमीयुगुलाचे मृतदेह धामणी नदीत दोघेही हारपवडेचे; आत्महत्येचा पोलिसांचा संशय

Next

कळे : हारपवडे (ता. पन्हाळा) येथून पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या प्रेमीयुगुलाचे रविवारी (दि. २३) धामणी नदीपात्रात मृतदेह आढळले. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हारपवडे येथील लहू सहदेव कांबळे (वय २२) आणि दीपाली बंडू कांबळे (१६) हे दोघे चार दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, आपल्या मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची फिर्याद दीपालीचे वडील बंडू शंकर कांबळे यांनी बुधवारी (दि. १९) कळे पोलिसांत दिली होती. त्यानुसार लहू कांबळे याच्याविरोधात कळे पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून पोलिसांसह नातेवाइकांकडून दोघांचा शोध घेत होते.

हारपवडे येथील धामणी नदीपात्रात रविवारी सकाळी दीपाली कांबळे हिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलीस पाटील संदीप चौगले यांनी कळे पोलिसांत दिली. कळे पोलिसांकडून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेणे सुरू असतानाच लहू कांबळे याचाही मृतदेह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सीपीआर येथे शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा दोघांवर हारपवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे हारपवडे गावात शोककळा परसली होती.

Web Title:  Kolhapur: The body of the missing lover, both of the Harpavade in the river Dhamani; Police suspect suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.