कोल्हापूर : निपाणीजवळ बोलेरोचा टायर फुटून भीषण अपघात, पाच ठार, तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:23 PM2018-06-25T12:23:52+5:302018-06-25T13:34:19+5:30

कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर भरधाव मालवाहू बोलेरोचा टायर फुटून आयशर टॅम्पोला धडक बसून झालेल्या भिषण अपघातात दोन्ही वाहनातील पाचजण जागीच ठार झाले. मृतामध्ये कोल्हापूरातील तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे.

Kolhapur: Bolero's tire breaks near Nashik, including five dead, three vegetable marketers | कोल्हापूर : निपाणीजवळ बोलेरोचा टायर फुटून भीषण अपघात, पाच ठार, तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश

कोल्हापूर : निपाणीजवळ बोलेरोचा टायर फुटून भीषण अपघात, पाच ठार, तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश

Next
ठळक मुद्देबोलोरोची आयशर टॅम्पोला धडक, पाच ठारनिपाणी येथील ईदगाह मैदानासमोर भिषण अपघात मृतामध्ये कोल्हापूरातील तिघांचा समावेश

कोल्हापूर/निपाणी : कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर भरधाव मालवाहू बोलेरोचा टायर फुटून आयशर टॅम्पोला धडक बसून झालेल्या भिषण अपघातात दोन्ही वाहनातील पाचजण जागीच ठार झाले. मृतामध्ये कोल्हापूरातील तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे.

नदीम इसाक बागवान (वय २४), शब्बीर करीम बागवान (२८), फयुम बागवान (२०), राज महमद अब्दूल गफार बागवान (३०, रा. भिमनगर, निपाणी, जि. बेळगाव), आयशर टॅम्पो चालक रमेश बी. बसाप्पा (४६, रा. हिरेकेरुर, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. आयशर टॅम्पोचा क्लिनर आनंद लम्माणी (२०, रा. हिरेकेरुर, जि. बेळगाव) हा जखमी आहे.


घटनास्थळी अपघाताचे दूष्य भयानक होते. मालवाहू बोलेरोचा चक्काचुर झाला होता. त्यामध्ये चौघांचे मृतदेह अडकून पडले होते. आयशर टॅम्पो चालकाचाही मृतदेह अडकला होता. जागेवर रक्ताचा सडा पडला होता. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. निपाणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने बाजूला घेतलेनंतर वाहतूक सुरुळीत झाली.


अधिक माहिती अशी, राज बागवान, नदीम बागवान, शब्बीर बागवान, फयुम बागवान हे सर्वजण भाजीपाला व्यावसायीक होते. कोल्हापूरातील कपीलतीर्थ मार्केट यार्ड येथे ते भाजीविक्रीचा व्यवसाय करीत होते. सोमवारी सकाळी ते कर्नाटकातील घटप्रभा येथून मालवाहू बोलोरो (एम. एच. ०९ सी. ए. ८८५०) मधून भाजीपाला घेवून कोल्हापूरला येत होते.

सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. भरधाव वेगात ते कोल्हापूरच्या दिशेने येत असताना निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर येताच त्यांच्या गाडीचा डाव्या बाजूचा टायर फुटला. अचानक चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून बोलेरो महार्गावरील दूभाजकाला धडकून ती उडून पलिकडच्या रस्त्यावर साताऱ्याहून बंगलोरला वाहनांचे आॅईल घेवून जाणाऱ्या आयशर टॅम्पोला (के. ए. ५२, ५७१४) समोरुन जोराची धडक देवून रस्त्यावर कोसळली. त्यामध्ये बोलोरोतील चौघांसह टॅम्पोचा चालक जागीच ठार झाले.


महामार्गावर मोठा आवाज झालेने निपाणी येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बोलोरो गाडीचा चक्काचुर झाला होता. त्यामध्ये चौघांचे मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत अडकून पडले होते. आयशर टॅम्पोची समोरची बाजू चेपल्याने चालक जागेवरच मृत झाला होता. अपघाताचे दूष्य अंगावर शहारे आनणारे होते.

बेळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक एच. टी. शेखर, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद पोवार, निपाणीचे निरीक्षक किशोर भरणी, शहर फौजदार अशोक चव्हाण यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघातानंतर महार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाग्रस्त वाहनातील अडकलेले मृतदेह बाहेर काढून ते रुग्णवाहीकेतून जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

 

शब्बीर बागवान 

शब्बीर बागवान हा वडीलोपार्जित भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. निपाणीहून होलसेल दरात भाजीपाला खरेदी करुन तो उपनगरात फिरुन विक्री करीत होता. आई-वडीलांचे निधन झालेने त्याचेवर कुटूंबाची जबाबदारी होती. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Kolhapur: Bolero's tire breaks near Nashik, including five dead, three vegetable marketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.