कोल्हापूर : राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी ‘ महाराष्ट्र ’ चे दोन्ही संघ पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:52 PM2018-09-28T16:52:14+5:302018-09-28T16:55:21+5:30

उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विभागाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

Kolhapur: Both teams of 'Maharashtra' qualify for the National Subroto Mukherjee Cup tournament | कोल्हापूर : राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी ‘ महाराष्ट्र ’ चे दोन्ही संघ पात्र

 उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांमध्ये अजिंक्यपद पटकाविलेला महाराष्ट्र हायस्कूलच्या विजयी संघासोबत प्रशिक्षक प्रदीप साळोखे.

Next
ठळक मुद्देकाडसिद्धेश्वर हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींचा संघ असे तीन संघ एकाचवेळी पात्र ठरले दोन्ही संघांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी राज्याचे संघ म्हणून निवड

कोल्हापूर : उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विभागाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या कामगिरीवर या दोन्ही संघांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी राज्याचे संघ म्हणून निवड झाली.

चौदा वर्षाखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने मुंबई विभागाचा ४-२ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्रकडून विजयी संघात संकेत मेढे, प्रशांत सलवादे, ओंकार ताते, आयुष केसरकर, निळकंठ चव्हाण, शुभम बेडेकर, ऋतुराज नलवडे, दर्शन पाटील, प्रेम देसाई, अमन सय्यद, अथर्व मोरे, पार्थ सुतार, श्रवण शिंदे, शाहीद महालकरी, पार्थ मोहीते, ऋषिकेश पाटील यांचा समावेश होता.

सतरा वर्षाखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने मुंबई संघाचा अंतिम सामन्यांत २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. यात महाराष्ट्रकडून विशाल पाटील, सिद्धीक नायकवडी यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.या विजयी संघात जय कामत, संदेश कासार, विश्व शिंदे, रोहीत देसाई, विशाल पाटील, विराज साळोखे, शुंभकर गोसावी, चंदन गवळी, ओंकार ेचौगुले, अनिरुद्ध जाधव, अभिषेक भोपळे, निरंजन कामते, सुशांत पाटील, सिद्धीक नायकवडी, शुभम कापुसकर, खुर्शिद अली यांचा समावेश आहे. या संघास प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हायस्कूलचे १४ व १७ वर्षाखालील मुले असे दोन व गुरुवारी (दि. २७) ला काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींचा संघ असे तीन संघ एकाचवेळी पात्र ठरले आहेत.



 उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांमध्ये अजिंक्यपद पटकाविलेला महाराष्ट्र हायस्कूलच्या विजयी संघासोबत प्रशिक्षक प्रदीप साळोखे.
 

Web Title: Kolhapur: Both teams of 'Maharashtra' qualify for the National Subroto Mukherjee Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.