कोल्हापूर : फुलेवाडीत आरोग्यसेविकेचा बंगला फोडला, सात तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:21 PM2018-08-09T18:21:57+5:302018-08-09T18:24:15+5:30
फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत.
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, विमल देवराम परते (वय ४२) यांचा फुलेवाडी रिंगरोड येथे ज्ञानसागर रेसिडेन्सी बंगला आहे. त्यांची बदली अहमदनगरला झाल्याने त्या १४ जुलैला नोकरीच्या ठिकाणी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.
बेडरुममधील कपाट फोडून त्यातील तीन तोळ्याचे गंठण, चार तोळ्याचा राणीहार असे सुमारे साततोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी परते यांना फोनवरून दिली. त्यांनी बुधवारी कोल्हापुरात येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.