कोल्हापूर : दूकानगाळ्यातून रोकड लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:39 IST2018-10-06T14:38:05+5:302018-10-06T14:39:02+5:30
ताराबाई पार्कातील द एम्पायर कॉम्प्लेक्स येथील नवीन सुरु असलेल्या इमारतीचे पहिल्या मजल्यावरील गाळ्याचे अर्धवट उघडलेले शर्टरमधून भिंतीला अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून चोरट्याने साडेनऊ हजार रुपये हातोहात लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. ५) दूपारी चारच्या सुमारास घडली.

कोल्हापूर : दूकानगाळ्यातून रोकड लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील द एम्पायर कॉम्प्लेक्स येथील नवीन सुरु असलेल्या इमारतीचे पहिल्या मजल्यावरील गाळ्याचे अर्धवट उघडलेले शर्टरमधून भिंतीला अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून चोरट्याने साडेनऊ हजार रुपये हातोहात लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. ५) दूपारी चारच्या सुमारास घडली.
अनिलकुमार शिवप्रसाद वर्मा (वय २३, बडाहरी, ता. मणकापूर, जि. गौंडा, उत्तरप्रदेश) हे गाळ्यात झोपले असताना हा प्रकार घडला. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसत आहे. तो मोपेड (एम. एच. ०९ ए. डब्ल्यु ९०६) मधून याठिकाणी आलेचे दिसत आहे. याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांत नोंद झाली असून चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
-------------------