कोल्हापूर : गुळ व्यापाऱ्यांची पावणेदोन लाखांची रोकड लंपास, लक्ष्मीपूरीतील घटना : दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:31 PM2018-01-17T12:31:17+5:302018-01-17T12:38:26+5:30
लक्ष्मीपूरी येथे गुळ व्यापारी दूकान बंद करुन घरी जात असताना दूचाकीला अडकवलेली बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये १ लाख ८६ हजार ४५० रुपये होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दोघे चोरटे बॅग पळविताना दिसत आहेत.
कोल्हापूर : लक्ष्मीपूरी येथे गुळ व्यापारी दूकान बंद करुन घरी जात असताना दूचाकीला अडकवलेली बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये १ लाख ८६ हजार ४५० रुपये होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दोघे चोरटे बॅग पळविताना दिसत आहेत.
अधिक माहिती अशी, संदीप शिवगोंडा सदलगे (वय ३४, रा. डफळे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) यांचा गुळाचा व्यवसाय आहे. लक्ष्मीपूरी येथे होलसेल गुळ विक्रीचे दूकान आहे. मंगळवारी दिवसभरात गुळ विक्रीतून जमा झालेली रक्कम १ लाख ८६ हजार ४५० रुपये तपकिरी रंगाचे पाकीटामध्ये ठेवून ते बॅगेत ठेवले होते.
रात्री नऊच्या सुमारास दूकान बंद करीत असताना त्यांनी पैशाची बॅग पत्नीकडे दिली. बाहेर पार्किंग केलेल्या दूचाकीच्या हॅन्डेलला बॅग अडकवून त्या तोंडाला स्कार्प बांधु लागल्या. तर सदलगे हे दूकानाचे शर्टर बंद करुन कुलपे घालुन मागे वळुन पाहतात तर बॅग गायब असल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा दूकान उघडुन बॅग आतमध्ये विसरली आहे का पाहिले असता दिसून आली नाही.
दूकानाच्या वरती खासगी दवाखाना आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दूचाकीला अडकवलेली बॅग दोन चोरटे चोरुन नेताना दिसले. हे दोघेही पाळत ठेवून होते. टेहाळणी करुन त्यांनी बॅग लांबवलेचे दिसून आले. याबाबत त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीसांत फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.