कोल्हापूर : ‘मंगळ’ मोहिमेच्या यशस्वितेचा आनंदोत्सव

By Admin | Published: September 25, 2014 12:07 AM2014-09-25T00:07:36+5:302014-09-25T00:20:32+5:30

शहरात आतषबाजी : विविध संघटनांनी साखर-पेढे वाटले

Kolhapur: The celebration of the success of 'Mangal' campaign | कोल्हापूर : ‘मंगळ’ मोहिमेच्या यशस्वितेचा आनंदोत्सव

कोल्हापूर : ‘मंगळ’ मोहिमेच्या यशस्वितेचा आनंदोत्सव

googlenewsNext


घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे महसूल उत्पन्नाचे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे. येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नियोजनाचा अभाव आहे. वसुली असूनसुद्धा वीज पुरवठ्याचे तीन- तेरा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
घाटनांदूर येथे दोन हजारच्यावर वीज ग्राहक आहेत. या ठिकाणच्या वीजबिल वसुलीचे प्रमाणही ९० टक्केंच्यावर आहे. मात्र वीज वितरण कंपनीने चोवीस तास वीज पुरवठ्याच्या आपल्याच घोषणेकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर कसलेही दुरूस्ती साहित्य येथे उपलब्ध नाही. डी.पी.चे फ्यूज, केबल सुद्धा शेतकऱ्यांनाच खरेदी करावे लागत आहे. मान्सूनपूर्व दुरूस्तीची कामे या भागात झालेली नसल्याने अनेक रात्री अंधारात काढाव्या लागलेल्या आहेत. येथील भगतसिंग नगरात उपकेंद्राच्या मागे सहा महिन्यांपूर्वी सिमेंट पोल मोडलेला आहे. तारांवरच तो खांब आज तग धरून आहे. मोडलेला खांब बदलण्यास येथील अभियंत्यांना मात्र वेळ नाही. नवाबवाडीला जाणाऱ्या रोडवरील नवीन कॉलनीत विद्युत खांबावरील तारा हाताला येत आहेत. या तारांबद्दल येथील रहिवाशी असलेले बुरांडे यांनी लेखी तक्रारही दिली आहे. मात्र याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास या जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
उपकेंद्रातील ५ एमव्हीएचे ट्रान्सफार्मर बिघडले असून त्याच्या दुरूस्तीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. मंगळवारी यामधून मोठा आवाज होऊन बुश उडाले व आॅईलही बाहेर पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वीज वितरण कंपनीला हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मंगळवारी दिवसभर वीज बंद होती. उडालेल्या बुशमध्ये डबल आॅईल भरून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते.
चुकीची वीज बिले आलेल्यांना चार- चार महिने वीज बिल दुरूस्त करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अंबाजोगाईच्या कार्यालयात अनेक वेळा खेटे मारूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे थकबाकीत वाढ होताना दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडीत झाला तर येथे कर्मचारी उपस्थित नसतो. खाजगी कंत्राटदार अनधिकृत कामे करत असल्याचा आरोप रामेश्वर नाईक यांनी केला.
सहायक अभियंता आंबेकर म्हणाले, दुरुस्तीसाठी बजेट उपलब्ध नाही आम्ही काय करणार? असे सांगून हात झटकले. (वार्ताहर)

Web Title: Kolhapur: The celebration of the success of 'Mangal' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.