कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:30 PM2018-09-25T15:30:54+5:302018-09-25T15:33:49+5:30

भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला. रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

Kolhapur: Chaku attack on traffic police women policeman, arrested accused | कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक

कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देवाहतूक शाखेच्या महिला पोलीसावर चाकु हल्ला, आरोपीस अटक भवानी मंडप येथील घटना : दूचाकी बाजूला घेतलेचा राग

कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला.

रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणास जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शहनाज महमद बागवान (वय २०, रा. सी वॉर्ड, बागवान गल्ली, बिंदू चौक) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, कॉन्स्टेबल रुपाली जोंधळे ह्या सोमवारी सकाळी नऊ पासून भवानी मंडप मेन राजाराम हायस्कूलचे प्रवेशद्वारासमोर वाहतूकीचे बंदोबस्ताचे काम करीत होत्या. दूपारी साडेबाराच्या सुमारास श्हनाज बागवान हा दूचाकी (एम. एच. ०८ सी. सी. २१६) घेवून याठिकाणी आला.

भवानी मंडप येथील राजाराम हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर तो दूचाकी पार्किंग करुन जावू लागला. यावेळी जोंधळे यांनी दूचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्याने ऐकले नसल्याने त्या स्वत: दूचाकी बाजूला घेवू लागल्या असता जोंधळे याने त्यांचा हात पकडून खिशामध्ये लपवलेला चाकूने त्यांच्या उजव्या हातावर वार केला.

हल्ल्यानंतर तो पळून जावू लागला. जोंधळे यांनी आरडाओरड करताच येथील नागरिकांनी त्याला पकडले. हाकेच्या अंतरावरील जुनाराजवाडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला अटक केली. जखमी जोंधळे यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 

 

Web Title: Kolhapur: Chaku attack on traffic police women policeman, arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.