कोल्हापूर :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण मारले, आर.के.नगरमधील घटना : चार तोळे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:36 AM2018-12-28T10:36:15+5:302018-12-28T10:37:46+5:30
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आर.के.नगर-मोरेवाडी येथील महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री आर.के.नगरात घडली. याबाबतची फिर्याद नूतन रत्नाकर मेळवंकी (वय ५५, रा. प्लॉट नंबर १७५, रत्नाप्पा कुंभारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. २६) दिली.
कोल्हापूर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आर.के.नगर-मोरेवाडी येथील महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री आर.के.नगरात घडली. याबाबतची फिर्याद नूतन रत्नाकर मेळवंकी (वय ५५, रा. प्लॉट नंबर १७५, रत्नाप्पा कुंभारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. २६) दिली.
पोलिसांनी सांगितले की, नूतन मेळवंकी या घराजवळ मंगळवारी (दि. २५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघे अज्ञात त्यांच्याजवळ आले. अज्ञातांनी ‘हनुमान मंदिर किधर?’ असे विचारले. मेळवंकी या पत्ता सांगत असताना त्यांतील एकाने त्यांच्या गळ्यातील पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसडा मारून पळवून नेले.
वृद्धेच्या कानात ओरडून चेन हिसकावली
साने गुरुजी वसाहत येथील कुसुम गणेश राजुरीकर (वय ८२, रा. घर नंबर २९२, शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर रोड) या मंगळवारी (दि. २५) अंबाबाई देवीचे दर्शन व भाजी खरेदी करून रात्री घरी जात होत्या. त्यावेळी न्यू महाद्वार रोडवरील एका बँकेच्या पाठीमागील रस्त्यावरून त्या जात असताना एक अज्ञात त्यांच्याजवळ आला. त्याने कुसुम राजुरीकर यांच्या कानांत मोठ्याने ओरडून त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली. अज्ञाताने पांढऱ्या रंगाचा लांब हातांचा शर्ट परिधान केला होता, असे वर्णन राजुरीकर यांनी फिर्यादीत दिले आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत बुधवारी (दि. २६) झाली.