कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:35 PM2018-04-28T13:35:50+5:302018-04-28T13:36:13+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी (दि.१)सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी (दि.१)सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.
शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळयास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सन्माननिय नागरीक, ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक, माजी सैनिक, सर्व खाते प्रमुख व सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी केले.
या समारंभास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, म्हणून सकाळी ७.१५ ते ९ या दरम्यान कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करुन नये.
ज्यांना असा स्वतंत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आहेत त्यांनी मंगळवारी (दि.१)सकाळी ७.१५ पूर्र्वी किंवा ९ वाजल्यानंतर करावा. ज्या ठिकाणी दरवर्र्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज उभारला जातो अशा सर्व शासकीय इमारतींवर, किल्यांवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.