कोल्हापूर :नाताळ निमित्त बाजारपेठेत गर्दी, सोमवारी ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:19 PM2017-12-22T18:19:12+5:302017-12-22T18:27:20+5:30
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला. दरम्यान, शहरातील कसबा बावडा, विक्रमनगर, ब्रम्हपुरी,लाईन बझार आदी परिसरातील चर्चमध्येही नाताळ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला.
दरम्यान, शहरातील कसबा बावडा, विक्रमनगर, ब्रम्हपुरी,लाईन बझार आदी परिसरातील चर्चमध्येही नाताळ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.२५) नाताळ हा सण आहे. यानिमित्त सांताक्लॉज पोशाख व मेणबत्ती, टोप्या आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. या सणानिमित्त वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये २० दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त वाईल्डर चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गुरुवार (दि. २१) पासून सुरु झालेल्या ख्रिस्मस फेस्टिव्हलचा शुक्रवारी समारोप झाला. फेस्टिव्हलमध्ये फुड स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच फनी गेम्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, क रल साँग्स व ड्रॉर्इंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याचा बक्षिस वितरण समारंभ शाहूपुरी पोलिस ठाणयाचे निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सायंकाळी झाला.
नाताळ सण दिवशी सोमवारी सकाळी वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये आठ वाजता इंग्रजी उपासना , पावणे दहा वाजता पहिली मराठी उपासना, ११ वाजून १५ मिनिटांनी दुसरी आणि दुपारी १२.३० वाजता तिसरी मराठी उपासना होणार आहे.
यावेळी वाईल्डर मेमोरियल चर्चचे मॉडरेटर रेव्ह. जे. ए. हिरवे व अनिल जाधव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता ख्रिस्त जन्मदिन मराठी उपासना शहर उपासना मंदिरात होणार आहे. यावेळी रेव्ह. डी. बी. समुद्रे मार्गदर्शन करणार असल्याचे पत्रक वायल्डर मेमोरियल चर्चने प्रसिद्धीस दिले आहे.