कोल्हापूर : ‘सीआयडी’चे पोलीस भासवून वृद्धाला ७५ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:22 PM2018-05-22T17:22:15+5:302018-05-22T17:22:15+5:30
सीआयडी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचे पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन दोघा अज्ञातांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना आयटीआय ते नाळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. २१) दुपारी घडली. याबाबत महादेव आनंदराव हंबरे (वय ६८, रा. नाळे कॉलनी बागेशेजारी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली.
कोल्हापूर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचे पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन दोघा अज्ञातांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना आयटीआय ते नाळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. २१) दुपारी घडली. याबाबत महादेव आनंदराव हंबरे (वय ६८, रा. नाळे कॉलनी बागेशेजारी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, महादेव हंबरे हे नाळे कॉलनीतील साई मंदिराजवळून दुपारी एकटेच जात होते. त्याच्याजवळ दोघे अज्ञात आले. ‘आम्ही सीआयडी पोलीस आहोत. आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने या रुमालात बांधा,’ असे त्या अज्ञातांनी त्यांना सांगितले.
अज्ञातांनी तो रुमाल त्यांच्याकडे दिला. थोड्या वेळाने हंबरे यांनी पाहिले तर त्या रुमालामधील २७ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत अज्ञात पसार झाले होते. या प्रकरणी अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.