कोल्हापूर शहर, सहा तालुक्यांतील दहावीचे सगळे विद्यार्थी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:11+5:302021-07-19T04:17:11+5:30
कोरोनामुळे यावर्षी दहावीची अंतिम लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्याऐवजी इयत्ता नववी आणि दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यमापन करून ...
कोरोनामुळे यावर्षी दहावीची अंतिम लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्याऐवजी इयत्ता नववी आणि दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्याचा ९९.९८ टक्के, कागल आणि पन्हाळा तालुक्याचा ९९.९७ टक्के, राधानगरीचा ९९.९२ टक्के, तर हातकणंगले तालुक्याचा ९९.६७ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील २४९१९ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये २११२२, द्वितीय श्रेणीमध्ये ८६१७ आणि उत्तीर्ण श्रेणीत ४३० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यावर्षी दहावीसाठी ३०३६६ मुलांनी आणि २४७७७ मुलींनी नोंदणी केली. त्यापैकी ३०३३७ मुले, तर २४७५१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नोंदणीमध्ये आघाडी असल्याने यावर्षी उत्तीर्ण होण्यात मुलींच्या तुलनेत मुलांनी आघाडी घेतली आहे.
तालुकानिहाय उत्तीर्ण एकूण विद्यार्थी
हातकणंगले : १२०११
कोल्हापूर शहर : ८०६८
करवीर : ६३६५
शिरोळ : ५१४७
पन्हाळा : ४२९२
कागल : ४०८३
गडहिंग्लज : ३३९३
राधानगरी : २६४७
चंदगड : २५४०
शाहूवाडी : २४००
भुदरगड : २१७२
आजरा : १४४०
गगनबावडा : ५३०
चौकट
१५०३ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
जिल्ह्यातील १६१६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एकूण १५०३ जण उत्तीर्ण झाले. त्यात ११७१ मुले आणि ३३२ मुली आहेत.