कोल्हापूर शहरात कोरोना रुग्ण घटले, मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:58+5:302021-07-12T04:16:58+5:30

कोल्हापूर: तब्बल दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर शहरातील कोरानाबाधितांची संख्या ३००च्या खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला असतानाच मृत्यू मात्र सर्वाधिक ...

In Kolhapur city, corona patients decreased, deaths increased | कोल्हापूर शहरात कोरोना रुग्ण घटले, मृत्यू वाढले

कोल्हापूर शहरात कोरोना रुग्ण घटले, मृत्यू वाढले

Next

कोल्हापूर: तब्बल दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर शहरातील कोरानाबाधितांची संख्या ३००च्या खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला असतानाच मृत्यू मात्र सर्वाधिक असल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यातील एकूण ३० मृत्यूंपैकी ११ मृत्यू हे एकट्या कोल्हापूर शहरातील आहेत, ही त्याहूनही अधिक चिंतेची बाब आहे. दरम्यान, रविवारी १,४९० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

जिल्ह्यात चार दिवसानंतर रुग्णसंख्या दीड हजारांपर्यंत आली आहेे. रविवारी १,५२२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात वाळवा तालुक्यातील दोघांचा अपवाद वगळता ३० मृत्यू एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. अजूनही सर्वाधिक मृत्यू व रुग्ण कोल्हापूर शहरातच आहेत. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कोल्हापूर शहरातील रुग्णवाढीचा वेग पहिल्यांदाच ३००च्या खाली आला आहे. सातत्याने साडेतीनशे, साडेचारशेच्यावर रुग्ण होते. मागील महिन्यात कोरोनाचा कहर झाला तेव्हा हा आकडा सहाशेच्यावरदेखील पोहोचल्याने शहरातील निर्बंध अधिक कडक करावे लागले होते. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध कमी होतील, अशी शहरवासीयांना आशा लागून राहिली आहे.

चौकट

सरसकट व्यवहार सुरु तरी रुग्ण घटले

विशेष म्हणजे कोल्हापुरात कडक लॉकडाऊन असताना रुग्णसंख्या जास्त होती, पण गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरु झाली, व्यवहार सुरळीत झाले तरी रुग्णसंख्या वाढण्याऐवजी घटली आहे. सरसकट व्यवहार सुरु झाले तर रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण रुग्ण घटल्याने कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरली आहे.

चौकट

खासगी लॅबमध्येच जास्त पॉझिटिव्ह

जिल्ह्यात सोमवारी १,५२२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यातील तब्बल १,०१६ स्वॅब तपासणीचे अहवाल हे खासगी लॅबमधील आहेत. सरकारी लॅबमधील तपासणीचे पॉझिटिव्ह अहवाल कमी येत असताना खासगीमध्येच का वाढतात, यावरुनही आता शंका घेतली जाऊ लागली आहे. नागरिकांमध्येही याबाबत कुजबूज सुरु झाली आहे.

आज झालेले मृत्यू

कोल्हापूर शहर : ११ जुना बुधवार पेठ, शिवाजी पेठ, कळंबा, साईक्स एक्सटेन्शन दोन, रंकाळा, राजोपाध्ये नगर, सीबीएस स्टॅन्ड, विचारे मळा, आझाद गल्ली, गंगानगर.

करवीर : ०४ सांगरुळ, भुयेवाडी, आंबेवाडी, खेबवडे.

पन्हाळा : ०२ उंड्री, तिरपण.

राधानगरी : ०२ तिटवे, राधानगरी.

हातकणंगले : ०५ हुपरी, तळंदगे, रेंदाळ, पुलाची शिरोली, इचलकरंजी.

शाहूवाडी : ०२ परखंदळे, वारेवाडी.

आजरा : ०१ हारपेवाडी.

शिरोळ : ०१ घोदरवाडी.

गडहिंग्लज : ०२ नेसरी, गिजवणे.

इतर जिल्हा : ०२ कुरळप, कुंडलवाडी (ता. वाळवा)

Web Title: In Kolhapur city, corona patients decreased, deaths increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.