कोल्हापूर शहर गणेश दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:35+5:302021-09-16T04:30:35+5:30
फोटो नं. १५०९२०२१-कोल-जय पद्मावती मंडळ ओळ : दरवर्षी पुरातन मूर्तीतून वेगळेपण जपणाऱ्या मंगळवार पेठेतील जय पद्मावती मंडळाने यंदा थायलंडमधील ...
फोटो नं. १५०९२०२१-कोल-जय पद्मावती मंडळ
ओळ : दरवर्षी पुरातन मूर्तीतून वेगळेपण जपणाऱ्या मंगळवार पेठेतील जय पद्मावती मंडळाने यंदा थायलंडमधील ख्लॉग चिक येथील मूर्तीची प्रतिकृती श्री गणेशमूर्तीतून साकारली आहे. मूळच्या मूर्तीची उंची ११ इंच आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो नं. १५०९२०२१-कोल-छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ
ओळ : संभाजीनगरातील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाने रायगड किल्ल्याच्या महादरवाजाची २३ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. महादरवाजातून आत गेल्यानंतर महालाला मेघडंबरीचे स्वरूप आणले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो नं. १५०९२०२१-कोल-संरक्षण तरुण मंडळ
ओळ : सोमवार पेठेत जोशी गल्लीतील संरक्षण तरुण मंडळाने हत्तीसोबत खेळणाऱ्या श्रीकृष्ण रूपातील श्रीगणेशमूर्ती साकारली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो नं. १५०९२०२१-कोल-सोल्जर ग्रुप
ओळ : तोरस्कर चौकातील श्री सोल्जर ग्रुपने टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्रा याची श्री गणेश रूपातील प्रतिकृती साकारली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)