कोल्हापूर ढगाळलेलेच, हवेतील गारठा कायम, पारा १८ अंशावर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:56 PM2018-12-05T17:56:00+5:302018-12-05T17:59:05+5:30

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरवर ढगांचे आच्छादन कायम आहे. सूर्यदर्शनच होत नसल्याने हवेतील गारठाही कायम आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मात्र जनजीवनावर आणि पिकांवर होत असल्याचे दिसत आहे.

Kolhapur is cloudy, continuous rains in the air, mercury remains stable at 18 degrees | कोल्हापूर ढगाळलेलेच, हवेतील गारठा कायम, पारा १८ अंशावर स्थिर

कोल्हापूर ढगाळलेलेच, हवेतील गारठा कायम, पारा १८ अंशावर स्थिर

Next
ठळक मुद्देकोल्हापूर ढगाळलेलेच, हवेतील गारठा कायम ढगाळ वातावरणाने पिकांवर परिणाम

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरवर ढगांचे आच्छादन कायम आहे. सूर्यदर्शनच होत नसल्याने हवेतील गारठाही कायम आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मात्र जनजीवनावर आणि पिकांवर होत असल्याचे दिसत आहे.

कर्नाटक किनारपट्टीवर वाहणाऱ्या वक्राकार वाऱ्यांच्या परिणामाने सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसत आहे.

सोमवारपासून ढगाळ वातावरणास सुरुवात झाली. मंगळवारी (दि. ४) ऊन-सावल्यांचा खेळ राहिला. बुधवारी तर सकाळपासूनच ढगांनी गर्दी केल्याने आभाळ भरून आल्यासारखे दिसत होते.  बुधवारी पारा १८ अंशावर स्थिर होता.
 

 

Web Title: Kolhapur is cloudy, continuous rains in the air, mercury remains stable at 18 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.