कोल्हापूर : दाट धुक्यासह कडाक्याची थंडी, तापमानात १५ डिग्रीपर्यंत घसरण, दैनंदिन जीवनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:47 AM2018-01-25T11:47:02+5:302018-01-25T11:58:01+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले तरी दाट धुक्याची चादर बाजूला होत नाही. धुक्यामुळे तर पाच फुटांवरीलही दिसत नव्हते.

Kolhapur: Coldness with thick fog, falling to 15 degrees in temperature, results in daily life | कोल्हापूर : दाट धुक्यासह कडाक्याची थंडी, तापमानात १५ डिग्रीपर्यंत घसरण, दैनंदिन जीवनावर परिणाम

दाट धुक्यातून वाट काढताना वाहनांना कसरत करावी लागते. राजाराम तलाव येथे धुक्यातून वाट काढत जाणारी बैलगाडी. (छाया- दीपक कुंभार)

Next
ठळक मुद्देदाट धुक्यासह कडाक्याची थंडी तापमानात १५ डिग्रीपर्यंत घसरण दैनंदिन जीवनावर परिणाम

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले तरी दाट धुक्याची चादर बाजूला होत नाही. धुक्यामुळे तर पाच फुटांवरीलही दिसत नव्हते.

साधारणत: जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी हळूहळू कमी होत जाते. फेबु्रवारीपासून तापमानात वाढ होत जाऊन कडक उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मकर संक्रांतीनंतर थंडी गायब झाली आणि वातावरण गरम होऊ लागले. त्यामुळे उन्हाचे चटके लवकरच सोसावे लागणार असे वाटत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत गेला.

पहाटे दाट धुक्याचे पांघरूण पाहावयास मिळते. त्यात अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. नदीकाठच्या गावांना तर सकाळी सात वाजेपर्यंत दाट धुक्याने झाकून टाकलेले दिसते. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला असून, शेतातील शेतमजुरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऊसतोड मजुरांना तर वाळलेला पाळापाचोळा पेटवूनच ऊसतोड करावी लागत आहे, इतका गारठा आहे. मॉर्निंग वॉकसाठी भल्या पहाटे घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळी सहा वाजले तरी अंथरूण सोडवत नाही.

ताप, सर्दीचे रुग्ण वाढले

धुके व थंडीमुळे सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ होत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णालयांत गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले
दाट धुके, त्यात रस्त्यावर पडणाऱ्या बारीक दवामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे चार-पाच फुटांवरील दिसत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

असे राहील तापमान डिग्रीमध्ये 

वार           किमान               कमाल
बुधवार          १५                  ३१
गुरुवार          १६                 ३१
शुक्रवार         १५                 ३२
शनिवार        १६                ३१

 

Web Title: Kolhapur: Coldness with thick fog, falling to 15 degrees in temperature, results in daily life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.