कोल्हापूर : मुश्रीफ फौंडेशनतर्फे यंदाही गणराया अॅवॉर्ड स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:49 PM2018-09-05T16:49:49+5:302018-09-05T16:51:43+5:30
नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : शहरातील गणेश मंडळामध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे बनवण्याची परंपरा वाढीस लागावी आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकला जावा, याकरीता नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोवार म्हणाले, सार्वजनिक उत्सवांमध्ये होत असलेले चुकीचे प्रकार टाळण्यासाठी आणि समाज प्रबोधनाची परंपरा मंडळाकडून सुरु राहावी या उद्देशाने २०१२ पासून फौंडेशनच्यावतीने ही स्पर्धा घेतली जाते.
सजिव देखावा, तांत्रिक देखावा, उत्कृ ष्ठ मुर्ती अशा विभागात जवळपास २५०हून अधिक गणेश मंडळे सहभागी दरवर्षी होतात. सजीव आणि तांत्रिक अशा दोन्ही विभागासाठी अनुक्रमे १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट मुर्ती विभागांतर्गत विजेत्या मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
याप्रसंगी सुनिल देसाई, निरंजन कदम, अमोल माने, सुहास साळोखे, संजय कुराडे, जाहिदा मुजावर, सुनिता राऊत, युवराज साळोखे, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.
शुक्रवारी बक्षिस वितरण
फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या गणराया अॅवॉर्ड २०१७ चे बक्षिस वितरण समारंभ उद्या, शुक्रवारी ७ रोजी दुपारी ३ वा. शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते मंडळांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. तरी मंडळाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.