कोल्हापूर : राजारामपूरी येथील रत्नाकर बँकेवर गुन्हा, चौदाशे रुपये परस्पर खर्च केल्याची ग्राहकाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:22 PM2018-04-14T14:22:33+5:302018-04-14T14:22:33+5:30
ग्राहकाच्या पूर्वपरवानगिशिवाय खात्यावरील चौदाशे रुपयांचा व्यवहार दाखवून पैसे खर्ची पाडलेप्रकरणी रत्नाकर बँक लिमीटेड इंडीया या बँकेच्या विरोधात राजारामपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
Next
ठळक मुद्देराजारामपूरी येथील रत्नाकर बँकेवर गुन्हाचौदाशे रुपये परस्पर खर्च केल्याची ग्राहकाची तक्रार
कोल्हापूर : ग्राहकाच्या पूर्वपरवानगिशिवाय खात्यावरील चौदाशे रुपयांचा व्यवहार दाखवून पैसे खर्ची पाडलेप्रकरणी रत्नाकर बँक लिमीटेड इंडीया या बँकेच्या विरोधात राजारामपूरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
संजय सदाशिव शिंदे (वय ५५, रा. राजारामपूरी आठवी गल्ली) यांचे राजारामपूरीतील रत्नाकर बँकेत खाते आहे. बँकेचे आॅनलाईन व्यवहार करण्यासाठी क्रेडीट कार्ड आहे.
खातेवरुन शिंदे यांची परवानगी न घेता आणि ओटीपी नंबर न वापरता परस्पर चौदाशे रुपयांच्या व्यवहार दाखवून पैसे खर्च पाडले. आपला विश्वासघात केलेप्रकरणी शिंदे यांनी बँकेच्या विरोधात फिर्याद दिली.