कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:46 AM2018-09-04T11:46:49+5:302018-09-04T11:49:00+5:30

मंगळवार पेठेतील बीअर बारमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी कुणाल किरण गवळी (माळी गल्ली, मंगळवार पेठ) व सुकेश शेखर शेट्टी (रा. ताराबाई पार्क) यांनी एकमेकाविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

Kolhapur: Conflicting Crimes against Mangeshkar Peth | कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

ठळक मुद्देमंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हेफुकट दारूची मागणी करीत मारहाण

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील बीअर बारमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी कुणाल किरण गवळी (माळी गल्ली, मंगळवार पेठ) व सुकेश शेखर शेट्टी (रा. ताराबाई पार्क) यांनी एकमेकाविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

कुणाल गवळी हा रविवारी रात्री बारमध्ये मद्यपान करण्यास गेला असता वेटरसोबत झालेल्या वादावादीतून बार मालक व महेश जाधव यांनी सोडावॉटरच्या बाटल्या गवळीच्या डोक्यात फोडल्या. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्याने बार मालकासह जाधवच्या विरोधात फिर्याद दिली. तर सुकेश शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत कुणाल गवळी व त्याच्या मित्रांनी बारमध्ये घुसून व्यवस्थापक प्रकाश, वेटर अजित व तुकाराम यांच्याकडे फुकट दारूची मागणी करीत मारहाण करीत बारमधील साहित्याची तोडफोड केली.

यावेळी एक अनोळखी गिऱ्हाईक काचेची बाटली लागून जखमी झाले. दोन्ही बाजूच्या संशयितांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.

 

Web Title: Kolhapur: Conflicting Crimes against Mangeshkar Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.