कोल्हापूर: पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताना कॉन्स्टेबल अटकेत
By तानाजी पोवार | Published: September 2, 2022 03:46 PM2022-09-02T15:46:50+5:302022-09-02T15:47:20+5:30
अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच
कोल्हापूर : अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहात पकडले. नामदेव औदुंबर कचरे (वय 36, रा. हातकणंगले) असे या अटक केलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात ऐन गणेशोत्सवातील झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली. आज, शुक्रवार दुपारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हातकणंगले येथील एका व्यवसायाने मेकॅनिकल विरोधात धारवाड (राज्य कर्नाटक) न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित मॅकेनिकल, तक्रारदार अनुपस्थित राहत होते. अखेर धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते. संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी मॅकेनिकल तक्रारदाराच्या घरी गेले. मात्र पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी संबंधित अटक वॉरंट प्रकरणात मदत मदत करू असे सांगून त्याच्याकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
संबंधित तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार केली. आज, शुक्रवारी सकाळी सापळा रचला असता तक्रारदार व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेताना पथकाने कचरे याला रंगेहात पकडले. हातकणंगले पोलीस स्टेशन परिसरातच ही घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कचरे याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबर्गेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनीही कारवाई केली.