कोल्हापूर : राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर हिमालयातून जल आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:27 PM2018-05-16T15:27:51+5:302018-05-16T15:27:51+5:30
कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोहीम २२ मेपासून सुरु होत आहे. अशी माहीती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोहीम २२ मेपासून सुरु होत आहे. अशी माहीती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याभिषके सोहळ्याला कोल्हापूर हायकर्स गु्रपच्यावतीने ट्रेकच्या माध्यमातून पाच ठिकाणाहून जल आणले जाणार आहे.त्याचा वापर राज्याभिषेकाकरीता केला जातो. हे पाणी हिमालयातील दशुर लेक या पीरपंजाल रांगेतील १५ हजार फुट उंचीवरील ठिकाणाहून व सह्याद्रीतील बळकट व महत्वपूर्ण अशा श्रीवर्धन, मनोरंजन, कोेंडेश्वर , ढाक, बहीरी, पन्हाळा येथून आणले जाणार आहे.
यासाठी कोल्हापूर हायकर्सची पहिले पथक २२ मे ला दशुर लेक साठी रवाना होणार आहे. त्यानंतर दुसरे पथक ३१ मे ला सह्याद्रीतील मोहीमेसाठी रवाना होणार आहे. विविध ठिकाणाहून आणलेले हे पाणी एकत्रित करुन ५ जून ला रायगडावर पोहचणार आहे.
या मोहीमेत सिद्धेस शेटके, रोहन निकम, सुरज निर्वाणी , ओंकार मोरे, ओम कटीयार, हे हिमालयातील, तर महाराष्ट्रातील मोहीमेसाठी राकेश सराटे, शशांक तळप, मुकुंद हावळ, संतोष घोरपडे, अतुल पाटील, निरंजन रणदिवे, तन्मय हावळ, यशराज हावळ, तेजन कुमठेकर हे सहभागी होणार आहेत.