कोल्हापूर : मानेवाडी चाकु हल्ला प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:36 IST2018-06-20T16:36:23+5:302018-06-20T16:36:23+5:30
मानेवाडी-केर्ली (ता. करवीर) येथे तरुणावर चाकु हल्ला करुन गंभीर जखमी केलेप्रकरणी पाच जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित संदीप माने, किरण माने, युवराज माने, (तिघे रा. मानेवाडी, ता. करवीर), प्रमोद पाटील, विशाला सर्जेराव पाटील (रा. उत्रे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर : मानेवाडी चाकु हल्ला प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
कोल्हापूर : मानेवाडी-केर्ली (ता. करवीर) येथे तरुणावर चाकु हल्ला करुन गंभीर जखमी केलेप्रकरणी पाच जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संशयित संदीप माने, किरण माने, युवराज माने, (तिघे रा. मानेवाडी, ता. करवीर), प्रमोद पाटील, विशाला सर्जेराव पाटील (रा. उत्रे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.
अविनाश पाटील आणि संदीप माने यांच्या उत्रे गावी डॉल्बी लावणेच्या कारणावरुन वादावादी झाली होती. अविनाशची चुलत बहिण कल्पना भिमराव लाड हिचे हदयाचे आॅपरेशन झाले होते.
त्यामुळे डॉल्बीचा आवाज कमी करण्यास सांगितलेचा राग मनात धरुन संदीप माने व त्याच्या साथीदारांनी अविनाशवर चाकु व काठीने हल्ला केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत.