कोल्हापूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडा, चौघा भामट्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:24 PM2018-10-22T15:24:57+5:302018-10-22T15:29:45+5:30

राष्ट्रीय कृत बँका, रेल्वे आणि सैन दलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून चौघा भामट्यांनी तरुणाला १४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी रविवारी (दि. २१) मूख्य सूूत्रधार संशयित बाजीराव उर्फ सागर मोहिते (रा. कनाननगर), सागर ब्रम्हदेव भोसले (रा. बारामती पुणे), सुदेश मधुकर आव्हाड, आशिष सुरेश आव्हाड (दोघे रा. कोंडवा, पुणे) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला

Kolhapur: Crime against four lacs of fourteen lakhs of offense, showing offense for government jobs | कोल्हापूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडा, चौघा भामट्यांवर गुन्हा

कोल्हापूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडा, चौघा भामट्यांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देशासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडाचौघा भामट्यांवर गुन्हा

कोल्हापूर : राष्ट्रीय कृत बँका, रेल्वे आणि सैन दलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून चौघा भामट्यांनी तरुणाला १४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी रविवारी (दि. २१) मूख्य सूूत्रधार संशयित बाजीराव उर्फ सागर मोहिते (रा. कनाननगर), सागर ब्रम्हदेव भोसले (रा. बारामती, पुणे), सुदेश मधुकर आव्हाड, आशिष सुरेश आव्हाड (दोघे रा. कोंडवा, पुणे) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, सय्यद शफिकउल्लाह पटेल (वय ३५, रा. तोरणानगर, सागरमाळ रेड्याची टेकडी परिसर, कोल्हापूर) हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या शेजारी राहणारे मुकूंद कदम हे जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी माझा मित्र बाजीराव मोहिते याचा शासकीय नोकरी लावण्यामध्ये हातखंडा आहे. त्याने शिरोली दूमाला (ता. करवीर) आणि कबनुर (ता. हातकणंगले) येथील दोन तरुणांना रेल्वेत नोकरी लावली आहे. तुझे कोणी नातेवाईकांना नोकरी लावायची असेल तर सांग म्हणून सांगितले होते.

पटेल यांचा भाचा रोशनजमीर मोहमद आस्लम चक्कोली याचे बारावीपर्यंत, त्याचा मित्र लक्ष्मण गोपाला लक्षाणी याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. दोघेही नोकरीच्या शोधात होते. त्यामूळे पटेल यांनी या दोघांना नोकरी लावण्यासाठी बाजीरावची भेट घेतली. त्याने भारतीय स्टेट बॅक, दक्षिण मध्य रेल्वे व भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी आहे.

साथीदार मित्र सागर भोसले, सुदेश आणि आशिष आव्हाड यांचेशी बोलणे करुन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पटेल यांचेकडून वेळोवेळी दिल्ली, बंगलुर, पुणे, निपाणी येथे १४ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर या चौघांनी संगनमत करुन रोशनजमीर चक्कोली आणि लक्ष्मण लक्षाणी या दोघांच्या नावे खोट्या नोकरीच्या आॅर्डरी पटेल यांना दिल्या. त्यांनी संबधीत रेल्वे आणि सैन्य दलात चौकशी केली असता अशी कोणतीही भरती झाली नसलेचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झालेचे लक्षात येताच त्यांनी संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक औदूंबर पाटील करीत आहेत.

गावात डिजीटल फलक

संशयित भामट्यांनी शिरोली दूमाला येथील युवकाला हाताशी धरुन त्याला रेल्वेमध्ये नोकरी लागलेचे दाखिवले. त्याला कलकत्त्यालाही रवाना केले. त्या युवकाने गावात आपल्या मित्र परिवाराला नोकरी लागल्याचे सांगितल्याने त्याच्या शुभेच्छांची डिजीटल फलक गावात लागली. हा माहोल संशयित इतर लोकांना गावात पाठवून चौकशी करण्यास सांगत असत. लोक त्या युवकाच्या घरापर्यंत चौकशी करीत. पटेल यांनीही चौकशी केली असता मुलगा नोकरीला लागला असून तो कलकत्ता येथे गेला आहे, असे त्याचे आई-वडीलांनी सांगितले. त्यामुळे पटेल यांचा भामट्यांवर विश्वास बसला.

संशयित सराईत

फसवणूकीत मूख्य सूत्रधार बाजीराव मोहिते याचेवर हाणामारीचे गुन्हे, सागर भोसले, सुदेश आव्हाड, आशिष आव्हाड यांचेवर जुनाराजवाडा, लक्ष्मीपूरी, करवीर आणि हडपसर पुणे येथे फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. चौघेही सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांना विविध गुन्ह्यात अटकही झाली आहे.
 

Web Title: Kolhapur: Crime against four lacs of fourteen lakhs of offense, showing offense for government jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.