कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दाभाडेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:42 PM2018-09-17T15:42:43+5:302018-09-17T15:49:47+5:30
सदर बझार येथील अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. ओंकार उर्फ भुकंप उर्फ बंड्या अनिल दाभाडे (वय १९, मूळ.रा. सातवे-सावर्डे ,ता. पन्हाळा) असे अटक केलेल्या नराधमाचे नांव आहे.
कोल्हापूर : सदर बझार येथील अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. ओंकार उर्फ भुकंप उर्फ बंड्या अनिल दाभाडे (वय १९, मूळ.रा. सातवे-सावर्डे ,ता. पन्हाळा) असे अटक केलेल्याचे नांव आहे. दरम्यान, रविवारी (दि.१६) सदरबझार परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने गुन्हा कबुल केला.
पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याची माहिती पीडितेने आजीला दिली. आजीने संशयित दाभाडे याच्याविरोधात फिर्याद दिली. पण ; संशयिताला पोलिसांनी अटक केली नव्हती. त्यामुळे रविवारी सायंकाळी संशयिताला अटक करावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस अधिकाऱ्यांनी संशयितास अटक करतो, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
संशयित सातवे-सावर्डे येथे त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. ओंकार दाभाडे हा गेल्या तीन महिन्यापासून त्याच्या आजीकडे सदरबझार येथे राहावयास होता. तो कोणताही काम धंदा करत नाही तर वडिल रिक्षाचालक आहेत. सोमवारी दूपारी संशयित दाभाडेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
याप्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमृता मेणकर करीत आहेत.