कोल्हापूर : दत्तगुरूंसह लोकदेवतांचे होणार दर्शन, नवउर्जा महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:38 PM2018-12-21T17:38:06+5:302018-12-21T17:41:15+5:30
कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे.
कोल्हापूर : पूर्वीच्या काळी दोन वेळचे पोट भरण्याचीही भ्रांत होती.मात्र आता ती सोय झाली आहे. यापुढच्या काळात मनाची भूक भागवण्याची गरज निर्माण होणार असून त्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे.
यावेळी अंजली पाटील, प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, देव मानणे न मानणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू ज्यामुळे लोकांना समाधान मिळते असे उपक्रम राबवणे हे शासनाचे आणि स्वयंसेवी संस्थांचे कर्तव्य आहे. याच भावनेतून गेल्यावर्षीप्रमाणेच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राहूल चिकोडे यांनी स्वागत केले तर चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, प्रताप कोंडेकर, विजय जाधव, आर. डी. पाटील, माणिक पाटील चुयेकर, नगरसेवक शेखर कुसाळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजय खाडे पाटील, उमा इंगळे, रूपाराणी निकम, जयश्री जाधव,नीता गुरव, सविता भालकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कणेरी मठावर पंतप्रधान येणार
आम्ही जो फ्लॉवर फेस्टिवल घेतला त्याच धर्तीवर कणेरी मठावर कायमस्वरूपी फुलांचे उद्यान उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.