कोल्हापूर : दुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतली, रस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:13 PM2018-07-03T12:13:37+5:302018-07-03T12:16:09+5:30

कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेमचंद उदासी (वय ३४, रा. गांधीनगर) असे त्यांचे नाव आहे.

Kolhapur: Death of a man falling on the road, Betul on the death of two wheelers | कोल्हापूर : दुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतली, रस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

कोल्हापूर : दुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतली, रस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतलीरस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेमचंद उदासी (वय ३४, रा. गांधीनगर) असे त्यांचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, भारत त्रिलोकचंद परमानंदानी (रा. गांधी पुतळा, गांधीनगर) हा दि. २७ जून रोजी मित्र कैलाश उदासी यांना घेऊन मोपेड दुचाकी (एम. एच. ०९ ई. क्यू ६९४३) वरून कोल्हापुरात आले होते.

काम आटपून शिरोली टोलनाका ते तावडे हॉटेल जाणाऱ्या रोडवर भारत परमानंदानी दुचाकी चालवित होता, त्याने ती उडविण्याचा प्रयत्न केला, यावेळी पाठीमागे बसलेले कैलास रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

दुचाकी उडविण्याची हौस मित्राच्या जिवावर बेतल्याने गांधीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारत परमानंदानी याच्या विरोधात निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 

Web Title: Kolhapur: Death of a man falling on the road, Betul on the death of two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.