कोल्हापूर : आजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:34 PM2018-09-03T15:34:01+5:302018-09-03T15:38:17+5:30

आजाराला कंटाळून स्वत:ला चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जबुेदा इब्राहिम पठाण (वय ६२, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २९) घडला होता.

Kolhapur: The death of an old man stabbed with a knife bitten by a knife | कोल्हापूर : आजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर : आजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यूलक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद

कोल्हापूर : आजाराला कंटाळून स्वत:ला चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जबुेदा इब्राहिम पठाण (वय ६२, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २९) घडला होता.

अधिक माहिती अशी, जुबेदा पठाण ह्या सोमवार पेठेत मुलगा इरफान, सून आसमा आणि दोन नातू अशा एकत्रितपणे राहत होत्या. त्यांचा मुलगा खासगी नोकरी करतो. सून आसमा हिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ती माहेरी गेली आहे.

बुधवारी (दि. २९) सकाळी मुलगा इरफान कामावर गेला. तो दुपारी जेवण्यासाठी घरी आला असता आई जुबेदा झोपल्या होत्या. आवाज देऊनसुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने अंगावरचे पांघरूण बाजूला केले असता आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांच्या पोटात चाकू खुपसलेला होता. हा प्रकार पाहून त्याने आरडाओरडा केला.

आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले. त्यांनी तत्काळ जुबेदा यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातून चाकू बाहेर काढला होता. गेली चार दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या.

पोलिसांनी त्यांचा रुग्णालयात जबाब घेतला असता आजाराला कंटाळून स्वत:च चाकूने भोसकून घेतल्याचा जबाब त्यांनी दिला होता. उपचार चालू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद झाली आहे.
 

 

Web Title: Kolhapur: The death of an old man stabbed with a knife bitten by a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.