कोल्हापुरात रविवार ठरला खरेदीचा वार...!

By admin | Published: March 6, 2017 02:37 PM2017-03-06T14:37:23+5:302017-03-06T14:37:23+5:30

‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो २०१७’  प्रदर्शन : दुस-या दिवशीही कोल्हापूरकरांचा उदंड  प्रतिसाद

Kolhapur decided to buy Sunday ...! | कोल्हापुरात रविवार ठरला खरेदीचा वार...!

कोल्हापुरात रविवार ठरला खरेदीचा वार...!

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 6 - लॅपटॉप  असो वा डेस्कटॉप; एलईडी टीव्ही असो अथवा घरगुती आटा चक्की, ब्रँडेड स्मार्टफोन, कॅमेरा, वीजबचत करणारी यंत्रणा अशा घरातील प्रत्येकासाठी लागणा-या वस्तूंची ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो 2017’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी करीत कोल्हापूरकरांचा रविवार हा ‘खरेदीवार’ ठरला. 
 
सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुनिया हौशी कोल्हापूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सुरू आहे. प्रदर्शनाचा आज (सोमवार) हा शेवटचा दिवस असून, ते सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे.
 
इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील हे अनोखे प्रदर्शन ‘घरातल्या प्रत्येकासाठी... प्रत्येक घरासाठी’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून मांडण्यात आले आहे. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार यांच्यासाठी दैनंदिन वापरातील विविध गॅझेट्सच्या असंख्य व्हरायटीज प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत.
 
अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारलेल्या गॅझेट्सचे कुतूहल शमविणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस असल्याने कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देणे पसंत केले. कॅमे-यामधील लेटेस्ट तंत्रज्ञान, लेन्स यांबद्दल माहिती घेण्यासह, लॅपटॉप, डेस्कटॉपमध्ये नवीन काय आहे याची विचारणा करताना अनेकजण दिसले. स्मार्टफोनमधील नवनवीन अपग्रेडसह, नवीन फिचर्स हाताळण्यासाठी तरुणाईने मोबाईल फोन्सच्या स्टॉलवर गर्दी केली होती. अनेकांनी नव्या फोनमधून सेल्फी घेत नवनवीन फंक्शन्स वापरून पाहिली.
 
इंटरनेटशिवाय चालणारा वायरलेस सीसीटीव्ही, ब्लू टूथद्वारे चालणा-या म्युझिक सिस्टीमसह, इन्व्हर्टर, प्रिंटरमधील नवीन तंत्रज्ञान, आदींबद्दलच्या शंका विचारत माहितीही घेतली. गृहिणींनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या आटाचक्की, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनच्या स्टॉल्सना भेट देणे पसंत केले. अनेकांनी आवडीच्या वस्तू खरेदी केल्या; तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येत असणा-या आकर्षक सवलती, डिस्काउंट्स, अर्थसहाय्य देण्यात येत असल्याने काहींनी त्यांचे बुकिंगही करून ठेवले. 
सर्वांसाठी उपयोगी पडतील अशा गॅझेट्सच्या दुनियेचे द्वार प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले असून, त्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या वैयक्तिक, गृहोपयोगी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तरी या प्रदर्शनाला हौशी कोल्हापूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. 
 
ऑफर्सची लयलूट
प्रदर्शनात सर्वच वयोगटांतील ग्राहकांचा विचार करून अद्ययावत गॅझेट्स तर उपलब्ध करून देण्यात आले आहेतच; त्याचबरोबर प्रदर्शनातील सहभागी नामवंत कंपन्यांच्या वस्तू खरेदी करणाºयांना विविध आकर्षक ऑफर्सही देण्यात येत आहेत.
ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष खरेदीला प्राधान्य
सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना असला तरी  प्रदर्शनाला गेल्या दोन दिवसांपासून मिळालेला प्रतिसाद पाहता, ग्राहक प्रत्यक्ष खरेदीलाही प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
सर्वांना मोफत प्रवेश
तंत्रज्ञान विश्वातील लेटेस्ट अपडेट देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे आज, सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे. 
 
खरेदी करा आणि बना भाग्यवान विजेते!
ग्राहकांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी केल्यास भव्य आॅफर्ससह लकी ड्रॉ काढण्यात येत असून, या माध्यमातून त्यांना हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळत आहे. 
 
प्रदर्शनात अद्ययावत गॅझेटस्वर आकर्षक ऑफर्ससह भव्य डिस्काउंट्स देण्यात येत असून,  खरेदी करणा-या ग्राहकांना हजारोंची बक्षीसे जिंकण्याची संधीही या माध्यमातून मिळणार आहे.
 
 
 प्रदर्शनातील गॅझेट्स:-
* अद्ययावत स्मार्टफोन
* ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप, प्रिंटर्स
* सर्व कंपन्यांचे कॅमेरे 
* वॉशिंग मशीन
* रेफ्रिजरेटर
* टीव्ही
* एसी
* इन्व्हर्टर
* सीसीटीव्ही 
* म्युझिक सिस्टीम, होम थिएटर
* गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
 

Web Title: Kolhapur decided to buy Sunday ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.