कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात मंगळवारी मोर्चा, व्यापारी संघटनांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:33 PM2018-08-06T15:33:49+5:302018-08-06T15:36:43+5:30

प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

  Kolhapur: The decision of Front, Industrial and Trade Unions on proposed electricity hike against Tuesday | कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात मंगळवारी मोर्चा, व्यापारी संघटनांचा निर्णय

कोल्हापुरात शुक्रवारी प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता विविध औद्योगिक, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली.

Next
ठळक मुद्देप्रस्तावित वीज दरवाढीविरोधात मंगळवारी मोर्चा, औद्योगिक, व्यापारी संघटनांचा निर्णय जिल्हाधिकारी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देणार निवेदन

कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

त्याचा निर्णय या संघटनांनी शुक्रवारी (दि. ३) कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. मुंबईत दि. २५ जुलैला राज्यस्तरीय वीज परिषद झाली.

त्यात प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळी दहा वाजता महावीर गार्डन येथून मोर्चाची सुरुवात होईल. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर तेथून मोर्चा महावितरणच्या कार्यालयाला जाईल. या मोर्चात सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सभासद, उद्योजक, व्यापारी सहभागी होणार आहेत.

या बैठकीस इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सूरजितसिंग पवार, ‘मॅक’चे उपाध्यक्ष गोरख माळी, ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत जाधव, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुरेश चौगुले, उद्योजक अतुल आरवाडे, कमलाकांत कुलकर्णी, दीपक परांडेकर, हर्षद दलाल, एस. एस. पाटील, अशोक जाधव, श्रीनिवास कुलकर्णी, जयदीप मांगोरे, अमर करांडे, संजय पेंडसे, ए. पी. चौगुले, आदी उपस्थित होते.

टप्प्याटप्प्याने आंदोलन

प्रस्तावित वीज दरवाढीमुळे सध्याचे दर हे दीडपट वाढणार आहेत. त्याचा फटका औद्योगिक, शेतीपंप, घरगुती, व्यापारी, आदी सर्वच ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय वीज परिषदेत करण्यात आला. टप्याटप्याने हे आंदोलन तीव्र केले जाणार असल्याची माहिती नितीन वाडीकर यांनी दिली.

 

 


प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात आज मोर्चा

औद्योगिक, व्यापारी संघटनांचा निर्णय; जिल्हाधिकारी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देणार निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
त्याचा निर्णय या संघटनांनी शुक्रवारी (दि. ३) कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. मुंबईत दि. २५ जुलैला राज्यस्तरीय वीज परिषद झाली. त्यात प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता महावीर गार्डन येथून मोर्चाची सुरुवात होईल. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर तेथून मोर्चा महावितरणच्या कार्यालयाला जाईल. या मोर्चात सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सभासद, उद्योजक, व्यापारी सहभागी होणार आहेत. या बैठकीस इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सूरजितसिंग पवार, ‘मॅक’चे उपाध्यक्ष गोरख माळी, ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत जाधव, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुरेश चौगुले, उद्योजक अतुल आरवाडे, कमलाकांत कुलकर्णी, दीपक परांडेकर, हर्षद दलाल, एस. एस. पाटील, अशोक जाधव, श्रीनिवास कुलकर्णी, जयदीप मांगोरे, अमर करांडे, संजय पेंडसे, ए. पी. चौगुले, आदी उपस्थित होते.
...........................................................................................
टप्प्याटप्प्याने आंदोलन
प्रस्तावित वीज दरवाढीमुळे सध्याचे दर हे दीडपट वाढणार आहेत. त्याचा फटका औद्योगिक, शेतीपंप, घरगुती, व्यापारी, आदी सर्वच ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय वीज परिषदेत करण्यात आला. टप्याटप्याने हे आंदोलन तीव्र केले जाणार असल्याची माहिती नितीन वाडीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
...................................................................................................
फोटो (०६०८२०१८-कोल-इंजिनिअरींग असोसिएशन) : कोल्हापुरात शुक्रवारी प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता विविध औद्योगिक, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाºयांची इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली.
.....................................................................................................

 

Web Title:   Kolhapur: The decision of Front, Industrial and Trade Unions on proposed electricity hike against Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.