कोल्हापूर : पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा, ‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या अांदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:37 PM2018-05-17T19:37:03+5:302018-05-17T19:37:39+5:30
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली.
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली.
गेल्या चार दिवसांपासून भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बॅँकेच्या इमारतीच्या विक्रीसाठी बी-टेन्युअरचा प्रश्न प्रलंबित असून, तो मार्गी लावण्याचे आश्वासन देऊनही पालकमंत्र्यांनी शब्द फिरविल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी पालकमंत्र्यांच्या गाडीने प्रवेश करताच आंदोलकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.