कोल्हापूर --फोडला आघाडीच्या पराभवाचा नारळ

By admin | Published: September 17, 2014 12:15 AM2014-09-17T00:15:30+5:302014-09-17T00:24:23+5:30

टोल समितीचे अनोखे आंदोलन : सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध; पाचजणांनी केले मुंडण

Kolhapur - The defeat of the lead, the coconut of defeat | कोल्हापूर --फोडला आघाडीच्या पराभवाचा नारळ

कोल्हापूर --फोडला आघाडीच्या पराभवाचा नारळ

Next

कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आज, मंगळवारी मिरजकर तिकटी येथे दुपारी प्रतीकात्मक श्राद्ध घालून पाच कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध केला. यावेळी अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गांधी मैदान येथे निवडणुकीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विजयाचा प्रचाराचा नारळ फोडणार असल्याने टोलविरोधी कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आघाडी सरकारच्या पराभवाचा नारळ फोडला.
कोल्हापुरातील टोल विरोधात कृती समितीने कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघांत महिनाभर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी समितीने ‘लावा रे लावा लवासाला टोल लावा’, ‘लावा रे लावा कऱ्हाडला टोल लावा’, अशी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आघाडीचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले. यावेळी साहेबराव काशीद, अरविंद तोरस्कर, हंबीरराव मुळीक, नंदकुमार सुतार या पाचजणांनी मुंडण केले. त्यानंतर सायंकाळी हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, अशोक पोवार, भगवान काटे, राजेश बाणदार, प्रसाद जाधव, जयदीप शेळके, वैशाली महाडिक, तेजस्विनी पांचाल, सुजाता पाटील, सुजाता चव्हाण, विजया फुले, उषा मुळीक यांच्यासह टोल समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

कोल्हापुरात मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मिरजकर तिकटी येथे काँग्रेस आघाडीचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा नारळ फोडला. याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

Web Title: Kolhapur - The defeat of the lead, the coconut of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.